आळंदीच्या भक्तीनंतर नर्मदा घाटात बाबांचा साष्टांग दंडवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:23 IST2019-11-07T12:23:15+5:302019-11-07T12:23:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आळंदी येथील दीपक शिवणकर एक वर्षापूर्वी साष्टांग दंडवत परिक्रमेला सुरुवात केली आहे. शिवणकर हे ...

आळंदीच्या भक्तीनंतर नर्मदा घाटात बाबांचा साष्टांग दंडवत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आळंदी येथील दीपक शिवणकर एक वर्षापूर्वी साष्टांग दंडवत परिक्रमेला सुरुवात केली आहे. शिवणकर हे द:या-खो:यासह नदीनाल्यातून दंडवत करीत भांगरापाणी ता.अक्कलकुवा या गावार्पयत पोहोचले आहे.
पुणे आळंदी येथील दंडवत बाबा यांनी दि.18 ऑक्टोबर 2018 रोजी नर्मदा उगमस्थान अमरकंठकपासून दंडवत नर्मदा परिक्रमा सुरु केली होती. ही परिक्रमा त्यांनी लागोपाठ दोन वर्ष चालू ठेवली.पहिलीपरिक्रमाहीओंकारेश्वरपासून चालू केली ती पूर्ण झाल्यानंतर दुसरी परिक्रमा ही अमरकंठकपासून सुरु केली आहे. परमपूज्य दंडवत बाबा हे नर्मदा परिक्रमा ही आपल्या नावाप्रमाणेच दंडवत करीत पूर्ण करण्यासाठी निघाले आहेत. 8 धडगाव शहरात पोहचण्यासाठी त्यांना 3 खूप कष्ट करावे लागले. त्यांनी खूप मोठमोठ्या द:या खो:यासह नदी-नाल्यातून ही दंडवत नर्मदा परिक्रमा त्यांना करावी लागली. धडगाव शहरात पोहचण्यासाठी दंडवत बाबा यांना एक वर्ष एक महिना पूर्ण इतका कालावधी लागला आहे. त्यांची दंडवत यात्रा ही पूर्ण तीन वषार्ची असून ते एका दिवसाला फक्त चार कि.मी. दंडवत परिक्रमा करत असतात.