दिल्लीतील मारहाणीच्या निषेधार्थ वकिलांचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:17 IST2019-11-07T12:17:45+5:302019-11-07T12:17:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी वकिलांवर हल्ला केल्याच्या आरोप करीत घटनेच्या बार असोसिएशनने ...

दिल्लीतील मारहाणीच्या निषेधार्थ वकिलांचे निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी वकिलांवर हल्ला केल्याच्या आरोप करीत घटनेच्या बार असोसिएशनने निषेध केला आहे. मंगळवारी जिल्हा न्यायालयाच्या बाहेर वकिलांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करीत एडवोकेट प्रोटेक्शन कलमाची मागणी करण्यात आली.
याबाबत जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, 2 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात वकील व पोलिसांमध्ये वाहन लावण्यावरून वाद निर्माण झाला. या वादातून पोलिसांनी वकिलांवर हल्ला केला.
गोळीबार करून लाठय़ा-काठय़ांनी व हाता बक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत अनेक वकील गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.कमलाकर सावळे, उपाध्यक्ष अॅड. समीर कुलकर्णी, सेक्रेटरी अॅड.समीर कुलकर्णी, जेष्ठ विधिज्ञ प्रशांत चौधरी,अॅड. सलीम व्होरा, अॅड. मनोज मोरे, अॅड.विशाल सोनार,अॅड.एम.व्ही रघुवंशी, अॅड. दिनेश पाटील, अॅड.कल्पेश जैन, अॅड.प्रशांत पाठक, अॅड.गोविंद गांगुर्डे, अॅड.गणीभाई, अॅड.रेखा अहिरे, अॅड.अनिल खैरनार, अॅड.अझहर पठाण, अॅड.मौसम चौधरी, अॅड.राजू मोरे, अॅड.भूपेंद्र पाटील, अॅड.अविनाश पाटील, अॅड.प्रदीप पाटील, अॅड.धनराज गवळी, अॅड.दीपक पाटील आदी उपस्थित होते.