आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST2021-02-21T04:58:04+5:302021-02-21T04:58:04+5:30

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज १ मार्चपर्यंत प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे जमा करायचा, असे प्रकल्प अधिकारी ...

Admitted tribal students to a reputed English school | आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देणार

आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देणार

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज १ मार्चपर्यंत प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे जमा करायचा, असे प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी कळविले आहे. सोबत सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत, विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्या संबंधित यादीतील अनुक्रमांक नमूद करून दाखल्याची सत्यप्रत, अनाथ अपंग असल्यास त्याबाबतचा दाखला, पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसल्याबाबत हमीपत्र, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा बदलता येणार नाही. त्याबाबत हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.

महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला, पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाची दाखल्याची सत्यप्रत, सोबत जोडवी. पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा वय सहा वर्ष पूर्ण असावे. अर्जासोबत २ पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवक/नगरपालिका यांचा (ऑनलाइन) दाखला जोडावा.

विद्यार्थ्याचे वडिलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत, विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थी सन २०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीत प्रवेश असल्याबाबतचे बोनाफाईड आदी कागदपत्रेदेखील अर्जासोबत जोडावीत. १मार्चनंतर प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी कळविले आहे.

Web Title: Admitted tribal students to a reputed English school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.