नवापुर येथील ग्रामसेविका जिल्हा रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 12:10 IST2020-06-02T12:10:16+5:302020-06-02T12:10:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : मालेगाव येथून परतलेल्या ग्रामसेविकेला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईल करण्यात आले आहे़ या महिलेचा पती मालेगाव ...

नवापुर येथील ग्रामसेविका जिल्हा रुग्णालयात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : मालेगाव येथून परतलेल्या ग्रामसेविकेला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईल करण्यात आले आहे़ या महिलेचा पती मालेगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला तातडीने नंदुरबार येथे दाखल करण्यात आले आहे़ ही महिला नवापुर शहरातील रहिवासी आहे़
नवापूर पंचायत समितीत कार्यरत महिला ग्रामसेविका मालेगाव येथे सासरी गेली होती. १० दिवसांपूर्वी नवापुर येथे परतल्यानंतर घरीच क्वॉरंटाईन होती. दरम्यान मालेगाव येथील महिलेच्या पतीचा स्वॅब रिपोेर्ट पॉजिटिव्ह आल्याने महिलेसही स्वॅब घेण्यासाठी सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. महिलेच्या घरातील दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे़