कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:08 IST2020-03-07T13:08:07+5:302020-03-07T13:08:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास उपचार ...

Administration ready to face Corona | कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास उपचार देण्यासाठी विशेष वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे़ या वार्डात रुग्ण दाखल करुन तातडीचे उपचार करण्यात येणार आहेत़
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात झालेले वातावरणीय बदल आणि परराज्य आणि पदेशात येथील नागरिकांचे होणारे दौरे यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची भिती आहे़ लगतच्या गुजरात राज्यातून वेळावेळी नागरिकांचा प्रवास होत असल्याने कोरोना पसरण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस दल यांनी दक्षता म्हणून सतर्कता बाळगणे सुरु केले आहे़ जिल्ह्यात अद्याप कोणी परदेशी नागरिक आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ परंतू फिरण्यासाठी उत्तर भारतातील राज्यात जाऊन परतलेल्या नागरिकांनी दक्षता म्हणून तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ मुंबईसह राज्यातील गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कता म्हणून मास्क बाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे़ जिल्हा रुग्णालयासोबतच जिल्हा आरोग्य विभागानेही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोयी करण्यावर भर दिल्याची माहिती देण्यात आली आहे़ थंड हवेच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांकडून दक्षता घेण्याबाबत सातत्याने सूचना करण्यात येत आहे़ तज्ञांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात कोरोना विषाणू तग धरणे कठीण असले तरी बदलत्या वातावरणाची त्याला साथ मिळण्याची शक्यताही त्यांच्याकडून नाकारण्यात आलेली नसल्याची माहितीही देण्यात आली आहे़

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सहा बेड असलेला वॉर्ड तयार करण्यात आला आहे़ या वॉर्डमध्ये स्वच्छता ठेवून येणाºया जाणाºया सर्वांसाठी सॅनेटायझेशची सुविधा देण्यात आली आहे़ वॉर्डात व्हेंटीलेटर ठेवण्यात आले आहे़ अद्याप याठिकाणी रुग्ण दाखल झालेले नसले तरी दर दिवशी येथील औषधी व यत्रांची माहिती घेऊन ते अपडेट करण्यावर भर दिला जात आहे़ जिल्ह्यातील ११ ग्रामीण रुग्णालय आणि २ उपजिल्हा रुग्णालयातही येत्या काळात याप्रकारे सोय करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे़ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात यापूर्वी स्वाईन फ्ल्यू झालेले रुग्ण दाखल झाल्यानंतर तातडीने उपचार व्हावेत म्हणून वॉर्डाची निर्मिती करण्यात आली होती़ याचप्रकारे कोरोना संशयितांवर उपचार करण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे़ रुग्ण आढळल्यास उपचार करणाºया वैद्यकीय पथकालाही वेगळी सुविधा मिळून त्यांना केवळ येथे तैनात केले जाऊ शकते़

४कोरोना व्हायरसबाबत अनेक समज आणि गैरसमज सध्या फैलावत आहेत़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आजाराबाबत विस्तृत माहिती दिली़
४कोरोना जंतू हे कोरोना परिवारातील विषाणू आहे़ हा विषाणू श्वसनाचे संसर्गजन्य रोग निर्माण करतो़ यापूर्वी निर्माण झालेले सार्स आणि मर्स हे आजार त्याच पठडीतील होते़
४प्रामुख्याने श्वसनक्रियेमार्फत, अस्वच्छ हातांद्वारे, पंचनसंस्थेमार्फत त्याचा प्रसार होऊ शकतो़
४हलका ताप, घसा दुखी, खोकला, अंगदुखी व मरगळ ही सौम्य लक्षणे आहेत़
४जोराचा ताप, पिवळा बेडका, छातीत दुखणे, दम लागणे ही मध्यम लक्षणे आहेत़
४श्वसनक्रिया अपयशी, शरीरभर संक्रमण, इतर अवयव निकामी होणे ही तीव्र लक्षणे आहेत़
४गरोदर माता, लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले, स्टेरॉईट युक्त औषधी घेणारे तसेच कॅन्सरग्रस्तांमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक होऊ शकतो़
४या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशिष्ट उपचार व लसीकरण नसले तरी लाक्षणिक उपचार, रुग्णाची निगा आणि संतुलित आहार यातून रुग्ण बरा होऊ शकतो़ रीयल टाईम पीसीआर विषाणूच्या जनुकीय रचनेची चिकित्सा, घशातील व थुंकीतील व शरीरातील द्रव्य तपासणी व लाक्षणिक चाचण्यातून रक्ताची पेशीची चाचणी, छातीचा एक्सरे व सीटी स्कॅन करुन या कोरोना बाधित आहे किंवा नाही, याचे निदान होते़

शासनाकडून यापूर्वी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याबाबत नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात परदेशातून, मुंबईसारखी मोठी शहरे आणि उत्तर भारतातून आलेल्या नागरिकांनी आरोग्याबाबत दक्षता बाळगली पाहिजे़ गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी लहान मुलांना सोबत घेऊन जाणे टाळावे़
-महेंद्र पंडीत, जिल्हा पोलीस अधिक्षक,
नंदुरबाऱ

शासनाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयात वॉर्ड तयार केला आहे़ यासाठी यदाकदाचित कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आलाच तर तज्ञांचा समावेश असलेले आरोग्य पथक तयार करण्यात आले आहे़ अद्याप जिल्ह्यातून कुठेही कोरोनाग्रस्त संशयित रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही़ परंतू दक्षता म्हणून यंत्रणा सज्ज आहे़
-डॉ़ के़डी़सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,
नंदुरबाऱ

शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांची माहिती आरोग्य विभागाला दिली आहे़ जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही़ सर्व प्रशासन सज्ज आहे़ शासनाकडून आलेल्या परिपत्रकानुसार सर्वच विभागांना सूचित करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणांबाबतही सूचना केल्या आहेत़ नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊ नये तसेच अफवा पसरु नयेत याबाबत वेळोवेळी जागृती केली जात आहे़
-धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी, नंदुरबाऱ

Web Title: Administration ready to face Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.