कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:24 IST2021-02-05T12:24:02+5:302021-02-05T12:24:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर कुक्कुटपालन केंद्रांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्ल्यू बाबत ...

The administration is alerted as the death rate of chickens has increased | कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासन सतर्क

कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासन सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर कुक्कुटपालन केंद्रांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्ल्यू बाबत अलर्ट घोषित केला आहे. नवापूर  तालुक्यातील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू चे प्रमाण वाढल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. नवापूर शहरात निनावी तक्रारी वरून चौकशी दरम्यान हजारो कोंबड्या मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले होते. 
 नाशिक आयुक्त कार्यलयातून  चौकशी साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी मृत कोंबड्या ची व्हिलेवाट कशी लावली ती माहिती जाणून घेतली. त्यावर मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. नवापूर परिसरातील इतर कुकुटपालन केंद्रांची पाहणी व चौकशी सुरू असून नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार आज नवापूर परिसरातील पोल्ट्री  फार्म वर नाशिक प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन डॉ. बाबुराव नरवाडे, सहायक आयुक्त पशुसवरधन डॉ. शहाजी देशमुख, सहायक आयुक्त पशुसवरधन डॉ. जी. आर. पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. पाडवी, डॉ. अमित पाटील, डॉ. योगेश गावीत, डॉ. के डी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. यु डी पाटील, पशुसंवर्धन अधिकारी नंदुरबार यांनी भेटी देऊन तपासणी केली.
सील लावलेले फार्म 
नवापुर तालुक्यातील एकूण २५ पोल्ट्री फार्म पैकी चार पोल्ट्री सील करण्यात आहे. डायमंड पोल्ट्री फार्म, वसीम पोल्ट्री फार्म, आमलिवाला पोल्ट्री फार्म, परवेज पठाण पोल्ट्री फार्म यांचे फार्म बुधवारी रात्री उशिरापर्यंत सील करण्यात आले. यापैकी डायमंड पोल्ट्री फार्म विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पोल्ट्री सील
नवापुर तालुक्यातील २५ पोल्ट्री फार्म पैकी चार पोल्ट्री फार्म मधून ११ पक्ष्यांचे नमुने पुणे  येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सदर चारही पोल्ट्री फार्म मधील पक्ष्यांची ने-आण वाहतूकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. नवापुर तालुक्यातील सर्व पोल्ट्री व्यवसायिकांची जिल्हा प्रशासन पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करीत आहे. प्रांताधिकारी यांनी पोल्ट्री व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या योग्य ते मार्गदर्शन केले. अशी माहिती पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरीया यांनी दिली
दोन दिवसात चार हजार कोंबड्याचा मृत्यू
बधुवारी १ हजार २८९ कोंबड्याचा मृत्यू झाला तर गुरूवारी २ हजार ६५५ गेल्या पंधरा दिवसांमध्ये नवापूर तालुक्यातील काही पोल्ट्री फॉर्म मध्ये २० ते २२ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पण सदर ठोस पुरावे आम्हाला आढळून आले नाही असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: The administration is alerted as the death rate of chickens has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.