निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:08 IST2019-09-20T12:06:58+5:302019-09-20T12:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व ...

Administration alert for election! | निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट !

निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट !

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. चारही विधानसभा मतदारसंघांसाठी नेमलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्रात आढावा बैठकी घेतल्या. मध्यप्रदेश आणि गुजरात सिमेवरील लगतच्या जिल्ह्यांच्या बॉर्डर मिटिंगा देखील सुरू आहेत.    
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेकडे सर्वाचेच लक्ष लागून आहे. घोषणा होऊन आचारसंहिता कधीही लागू शकते या शक्यतेने प्रशासनासह राजकीय पक्षांनीही तयारी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज बैठकांचे सत्र सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून तयारीचा आढावा घेतला जात आहे. यामुळे प्रशासकीय स्तरावर लगबग सुरू झाली आहे. 
अधिका:यांची नियुक्ती
चारही विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिका:यांची नेमणूक करण्यात आली असून संबधीत अधिका:यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. 
स्थानिक स्तरावर मतदार यादी जाहीर करणे, आवश्यक कर्मचारी व मणुष्यबळाची जुळवाजुळव, वाहनांचे अधिग्रहण, मतदान केंद्रांची स्थिती आणि बंदोबस्ताचे नियोजन याची माहिती घेतली जात आहे. 
बॉर्डर मिटिंगा
नंदुरबार जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर आहे. त्यामुळे आंतरराज्य सिमेवर निवडणूक काळात विशेष दक्षता घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेता चारही विधानसभा मतदारसंघाच्या पोलीस अधिका:यांनी बॉर्डर मिटिंगा घेण्यास सुरुवात केली आहे. 
नवापूर मतदारसंघाला गुजरातची हद्द, नंदुरबार मतदारसंघाला गुजरातसह धुळे जिल्ह्याची हद्द लागून आहे. अक्कलकुवा मतदारसंघाला गुजरातसह मध्यप्रदेश तर शहादा मतदारसंघाला देखील गुजरात व मध्यप्रदेश सिमा लागून आहे. त्यामुळे चारही मतदारसंघात विशेष दक्षता घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे किमान 17  ठिकाणी चेकपॉईंट तयार करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सव्र्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. 
भरारी पथकांचीही नियुक्ती
निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर खर्च, आचारसंहिता आणि इतर बाबींसाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर होताच ही पथके कार्यान्वीत होणार आहेत. त्यासंदर्भात जिल्हाधिका:यांनी बैठक घेवून आवश्यक त्या सुचनाही दिल्या  आहेत. 
 

Web Title: Administration alert for election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.