आदिवासी मुलां-मुलींच्या वसतिगृहांमध्ये अद्यापही शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:49 PM2018-07-21T12:49:06+5:302018-07-21T12:49:13+5:30
नंदुरबार : भोजन कक्ष बंद करून डीबीटीमुळे गेल्या आठवडाभरापासून चर्चेत असलेल्या आदिवासी मुलां-मुलींच्या वसतिगृहांमध्ये अद्यापही शुकशुकाट आह़े डीबीटी विरोध होत असला तरी आदिवासी विकास विभागाचे संकेतस्थळ कोलमडल्याने नंदुरबार प्रकल्पांतर्गत साडेतीन हजार विद्याथ्र्याचे प्रवेश झालेले नाहीत़
गेल्या महिन्यापासून आदिवासी विकास विभागाने वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली होती़ प्रारंभी विभागाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्याथ्र्याचे हाल झाले होत़े यातून संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर डीबीटीसाठी सक्तीने आधार लिंकिंग करण्याचे आदेश काढल्यानंतर पालक आणि विद्यार्थी यांची धावपळ सुरू आह़े डीबीटीच्या सक्तीसाठी विद्यार्थी आणि आदिवासी संघटनांचा विरोध सुरू असताना पुन्हा संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रवेश रखडले आहेत़ यातून नंदुरबार प्रकल्पातील वसतिगृह आजघडीस ओस पडली असून विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आह़े नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत नवापूर, शहादा आणि नंदुरबार या शहर आणि तालुक्यांमध्ये 29 वसतिगृहे आहेत़ यात मुलींचे 12, तर मुलांचे 17 वसतिगृह आहेत़ या सर्व 29 वसतिगृहात इमारत क्षमतेनुसार 4 हजार 785 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात येतो़ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जुन्या विद्याथ्र्यासह विशेष बाबीतील विद्याथ्र्याचे प्रवेश पूर्ण झाले आहेत़ सर्व 29 वसतिगृहात आजअखेरीस 1 हजार 112 विद्याथ्र्याचे प्रवेश झाले असले तरी 3 हजार 673 मुलामुलींचे प्रवेश अद्यापही शिल्लक आहेत़ प्रवेश घेतलेल्या या 1 हजार 112 विद्याथ्र्याच्या खात्यावर नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने भोजन आणि निर्वाह भत्त्याची प्रती विद्यार्थी 3 हजार 600 रुपयांची रक्कम वर्ग केली आह़े तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे वाटप प्रकल्प कार्यालयाने पूर्ण केल्याचे सांगण्यात आले आह़े ही रक्कम विद्याथ्र्याना देण्यात आली असली तरी डीबीटी विरोध करणा:या विद्याथ्र्यानी ही रक्कम खात्यातून काढलेली नसल्याची माहिती आह़े