आदिवासी अकादमीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अडीच कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:26 IST2018-11-12T13:26:35+5:302018-11-12T13:26:40+5:30

प्रशासकीय बैठक : पालकमंत्री रावल यांची माहिती

Adivasi Academy sanctioned 2.5 crore funds from District Planning Committee | आदिवासी अकादमीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अडीच कोटीचा निधी मंजूर

आदिवासी अकादमीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अडीच कोटीचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी विद्याथ्र्याच्या सोयीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र असलेल्या आदिवासी अकादमीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून 2 कोटी 50 लाख रूपयांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होत़े 
बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ पी़पी़पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ एम़ कलशेट्टी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदचे सदस्य दिलीप पाटील, सिनेट सदस्य दिनेश खरात, पोलीस अधिक्षक संजय पाटील, तहसीलदार गोपाळ पाटील, उपअभियंता सुधाकर चौरे, मंडळाधिकारी ङोड़एम़पठाण उपस्थित होत़े 
बैठकीत पालकमंत्री रावल म्हणाले की, आदिवासी विद्याथ्र्याच्या सोयीसाठी सुरु होणा:या या केंद्रात विद्यापीठातील काही कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात येणार आह़े संशोधन केंद्रासाठी 2 कोटी 50 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आह़े तसेच विद्यापीठात टूरिस्ट गाईड हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार यावा अशी सूचनाही पालकमत्र्यांनी बैठकीत केली़
या केंद्रासाठी एकूण पाच कोटी रूपयांचा खर्च निर्धारित आह़े अडीच कोटी रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाने वर्ग केल्यानंतर विद्यापीठ अडीच कोटी रूपयांचा निधी देणार असल्याची माहिती आह़े 
 

Web Title: Adivasi Academy sanctioned 2.5 crore funds from District Planning Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.