आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:31 IST2019-11-26T12:31:27+5:302019-11-26T12:31:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी लागू केलेल्या आचारसंहितेचे ...

Adherence to the Code of Conduct | आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी लागू केलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
नंदुरबार तालुक्यातील निवडणुकांच्या तयारीसाठी तहसिल कार्यालयात अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक व पोलीस प्रशासनाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नायब तहसिलदार गोपाळ पाटील, विस्तार अधिकारी एन.जी.पाटील व दिनेश वळवी आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुका होत असून या निवडणुकांसाठी लाू करण्यात आलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले. 
निवडणूक कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, विविध घटकांमार्फत पत्रक व पोष्टरबाजी होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे सांगण्यात आले. याशिवाय शोसल मीडियावर पोलीस यंत्रणा व प्रशासनाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेमार्फत याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात  आल्या.
 

Web Title: Adherence to the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.