कंगनाच्या प्रतिमेला जोडेमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:34 IST2020-09-06T12:34:38+5:302020-09-06T12:34:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिवसेना नंदुरबार वतीने शिवसेना महिला आघाडी नंदुरबार जिल्हासंघटक रिना पाडवी यांच्या नेतृत्वाखाली कंगना रानावत ...

Add to the image of Kangana | कंगनाच्या प्रतिमेला जोडेमार

कंगनाच्या प्रतिमेला जोडेमार


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिवसेना नंदुरबार वतीने शिवसेना महिला आघाडी नंदुरबार जिल्हासंघटक रिना पाडवी यांच्या नेतृत्वाखाली कंगना रानावत हिने केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत आज शनिवारी दिनदयाल चौक परिसरात कंगना रनावतच्या प्रतिमेला जोडे मारून जाळण्यात आले व कंगना रनावत चा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हासंघटक रिना पाडवी , नंदुरबार पालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती कल्याणी मराठे, भाग्यश्री मराठे, युवा सेना नंदुरबार जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, शिवसेना शाखाप्रमुख प्रफुल खैरनार, दिग्विजय पाटील, लखन माळी, युवासेना शाखा प्रमुख दिनेश भोपे, उमर्दे उपसरपंच सागर साळुंके, घारू कोळी, राजेश गवळी, वैभव मराठे, गणेश मराठे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
मुंबई महाराष्टÑाबद्दल कोणतेही अपमानजनक उद्गार शिवसेना खपवून घेणार नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करीत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील रिना पाडवी यांनी यावेळी केली. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध संघटनांतर्फे कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
 

Web Title: Add to the image of Kangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.