निसर्गाच्या सान्निध्यातील अडगबंगनाथ मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:02+5:302021-08-29T04:30:02+5:30
तापी गोमती, पुलिंदा या तीन नदीच्या संगमाजवळ व निसर्गाच्या कुशीत अडबंगनाथचे मंदिर दिमाखात उभे आहे. मंदिर पुरातन असून पूर्वभिमुख ...

निसर्गाच्या सान्निध्यातील अडगबंगनाथ मंदिर
तापी गोमती, पुलिंदा या तीन नदीच्या संगमाजवळ व निसर्गाच्या कुशीत अडबंगनाथचे मंदिर दिमाखात उभे आहे. मंदिर पुरातन असून पूर्वभिमुख आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी श्रावण मासाच्या पहिल्या व शेवटच्या सोमवारी रोटचा कार्यक्रम होतो. गेल्या अनेक वर्षापासून येथे तप,यज्ञकर्म आदी होत असतात. अडबंगनाथ मंदिर हे एका उंच जागेवर आहे. व खाली दरी आहे. सकाळी -सकाळी सूर्यकिरणे या मंदिरावर पडत असतात.जे भाविक संकल्प करतात आणि वर्षभरामध्ये ते पूर्ण झाल्यावर श्रावण मासात रोटचा कार्यक्रमसाठी येथे हजेरी लावतात.
पहिल्या सोमवारी या ठिकाणी कार्यक्रम झाला. आता शेवटच्या सोमवारी येथे कार्यक्रम होणार आहे. म्हणून प्रकाशा येथील भोई समाजाच्या तरुण मंडळाने येथे तशी सुविधा करून दिलेली असल्याची माहिती भोई समाज अध्यक्ष प्रवीण भोई, विलास भोई, पंकज भोई यांनी दिली.