गार्डनच्या उ्घाटनासाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST2021-03-01T04:36:10+5:302021-03-01T04:36:10+5:30
नंदुरबार : पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या मॉ-बेटी गार्डनच्या उद्घाटनासाठी सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व शिवसेनेच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती ...

गार्डनच्या उ्घाटनासाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर येणार
नंदुरबार : पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या मॉ-बेटी गार्डनच्या उद्घाटनासाठी सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व शिवसेनेच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे हे येणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
नंदुरबार पालिकेतर्फे वळण रस्त्यावर मॉ-बेटी गार्डन तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी केवळ महिला व मुलींनाच प्रवेश राहणार आहे. या गार्डनच्या उद्घाटनासाठी सिने अभिनेत्री तथा शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात येत आहे. त्यांची प्राथमिक होकार कळविला असून अंतिम तारीख घेण्यासाठी दोन दिवसात त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा या देखील येणार आहेत. साधारणत: मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होईल.
अतिक्रमण काढण्यासाठी आग्रही
शहरातील अतिक्रमण निघावे यासाठी आपण आग्रही आहोत. यासाठी उच्च न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना देखील पत्र दिले आहे. अतिक्रमण कुणाचेही असो ते निघलेच पाहिजे. अतिक्रमणामुळे शहराचा चेहरा विद्रूप होत आहे. अतिक्रमण काढतांना सामान्यांचे नुकसान होते. त्यामुळे सरसकट सर्वांचेच ते निघावे, अशी आपली भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.