शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील १८ स्वस्त धान्य दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रेशनमधील अनागोंदी व अनियमिततेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील १८ स्वस्त धान्य दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रेशनमधील अनागोंदी व अनियमिततेच्या भाजपच्या तक्रारीवर प्रशासनाने संबंधीतावर कारवाई करावी या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाच्या उत्तरदाखल हे लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर भाजपने आंदोलन मागे घेतले.नवापूर तालुक्यातील स्वस्त धान्य वाटप व्यवस्था सुरळीत नसल्याची तक्रार भाजप पदाधिकाऱ्यांनी १८ मे २०२० रोजी निवेदनातून केली होती. प्रशासनाकडून त्यावर आजतागात कार्यवाही झाली नाही व विभागाकडून लेखी खुलासाही देण्यात आला नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरण व्यवस्था सुरळीत होऊन तक्रार झालेल्या दुकानदारांवर कार्यवाही करुन त्यांचे दुकान रद्द करण्याच्या मागणीसाठी नवापूर भाजपातर्फे तहसीलदार कार्यालयाजवळ शुक्रवारी उपोषण सुरु करण्यात आले. जि.प.चे माजी अध्यक्ष व भाजपा नेते भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, जिल्हा चिटणीस एजाज शेख, नगरसेवक महेंद्र दुसाने, शहराध्यक्ष प्रणव सोनार, जयंती अग्रवाल, जाकीर पठाण, माजी नगरसेवक रमेशचंद्र राणा, हेमंत जाधव, समीर दलाल, जितेंद्र अहिरे, दिनेश चौधरी, सफू मिस्त्री, भिमसिंग पाडवी, भाविन राणा व कार्यकर्त्यांनी सनदशीर मार्गाने सोशल डिस्टन्स राखून उपोषण सुरू केले होते. दुपारी दोन वाजता तहसीलदार सुनीता जºहाड यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करुन १८ स्वस्त धान्य दुकानदारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आपले उपोषण मागे घेतले. यासह आॅनलाईन डाटा एन्ट्रीची कामे एक महिन्याचा आत पूर्ण करण्यात येईल, असेही आश्वासन तहसीलदारांनी दिले. शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेप्रसंगी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.प्रशासनाकडून तक्रार झालेल्या १८ दुकानांबाबत चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आला होता. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून त्यातील १२ दुकानांबाबत कारवाई करण्यात आली. कारवाईत काहींचे परवाने निलंबीत करण्यात आले. काहींची अनामत रक्कम १०० टक्के जप्त करुन दंड करण्यात आला तर काहींचे परवाने रद्द करण्यात आले. नगारे, बिजादेवी, अंठीपाडा, मोठे कडवान, देवलीपाडा, देवमोगरा, वागदी, घोगळपाडा व महिला बचत गट संचलित नवापूर शहरातील एका दुकानाचा त्यात समावेश आहे.