नवापुर येथील सिमा तपासणी नाक्यावर ट्रकचालकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:23 IST2020-03-04T12:22:48+5:302020-03-04T12:23:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान जादा माल वाहतूक करणारा ...

Action on truck driver at Nimapur checkpoint | नवापुर येथील सिमा तपासणी नाक्यावर ट्रकचालकावर कारवाई

नवापुर येथील सिमा तपासणी नाक्यावर ट्रकचालकावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान जादा माल वाहतूक करणारा ट्रक आढळून आल्यानंतर कारवाई करण्यात आली़ रविवारी सायंकाळी झालेल्या कारवाई प्रकरणी सोमवारी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला़
सिमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षक अनिस संभाजी केदार हे वाहन तपासणी करत असताना त्यांना एमएच १४ एच यू ३०१९ या वाहनात रस्त्याचे नुकसान होऊन हानी पोहोचेल अशा पद्धतीने जादा माल भरल्याचे दिसून आले़ ट्रकचालकाला याबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याच्याविरोधात अनिस केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत़ नव्या वर्षात सीमा तपासणी नाक्यावर प्रथमच अवजड वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात आली आहे़ येथून दिवसभरात इतरही वाहनात क्षमतेपेक्षा अधिक माल असल्याचे दिसून आले आहे़

Web Title: Action on truck driver at Nimapur checkpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.