शहाद्यातील बायोडिझेल पंपावर कार्यवाही करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:11+5:302021-07-02T04:21:11+5:30

याबाबत नंदूरबारचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी, शहादा प्रांताधिकारी, तहसीलदार, आदींना लेखी निवेदन पाठवून अजय छाजेड यांनी शहाद्यात ...

Action should be taken on the biodiesel pump in Shahada | शहाद्यातील बायोडिझेल पंपावर कार्यवाही करावी

शहाद्यातील बायोडिझेल पंपावर कार्यवाही करावी

याबाबत नंदूरबारचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी, शहादा प्रांताधिकारी, तहसीलदार, आदींना लेखी निवेदन पाठवून अजय छाजेड यांनी शहाद्यात सुरू असलेल्या विना परवाना बायोडिझेल पंप विरोधात तक्रार केली आहे. छाजेड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहादा येथे जानेवारी २०१९ पासून विनापरवाना अनधिकृतपणे बायोडिझेल पंप सुरू आहे. या पंपावर बायोडिझेलच्या नावाखाली काळ्या ऑईलचे रिफायनरी मशीनद्वारे फिल्टर करून व त्यात घातक रसायन मिसळून व डिझेलसारखा रंग देऊन अशा बोगस डिझेलची सर्रासपणे विक्री करण्यात येते. या केमिकलयुक्त डिझेलमुळे ग्राहकांची फसवणूक तर होतेच, पण पर्यावरणाचेदेखील मोठे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. या डिझेल पंपावर २०२० मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तहसीलदारांनी कार्यवाही करून पंप सील केला होता व संबंधितांवर गुन्हाही दाखल झाला होता. संबंधित आरोपी जामीनवर सुटले असताना त्यांनी पुन्हा अवैधपणे बायोडिझेल पंप सुरू करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे प्रशासनाने आरोपी परेश सोनार, वसीम खिमाणी, शैलेश खंडेलवाल, समीर खिमाणी व जितेश खंडेलवाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अजय छाजेड यांनी केली आहे.

Web Title: Action should be taken on the biodiesel pump in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.