गाईंना जखमी करून तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST2021-02-21T04:58:33+5:302021-02-21T04:58:33+5:30

शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शहरातील जुना प्रकाशा ...

Action should be taken against those who injured cows and smuggled them | गाईंना जखमी करून तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करावी

गाईंना जखमी करून तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करावी

शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून शहरातील जुना प्रकाशा रस्ता, दोंडाईचा रस्ता, खरेदी-विक्री संघासमोर, डोंगरगाव रस्ता, गांधीनगर परिसरासह अनेक भागात मोकाट गाई फिरतात. या गाईंना रात्रीच्या वेळी काही समाजकंटक धारदार शस्त्रांनी वार करून सातत्याने जखमी करीत आहेत. ही बाब गंभीर असून रक्तबंबाळ व जखमी झालेल्या गाईंना वैद्यकीय सेवा देतानाही जिकिरीचे होते. अशा या स्थितीत गोरक्षा सेवा समितीचे कार्यकर्ते दररोज गाईंची सेवा करतात. काही समाजकंटक गोरक्षा समितीचे कार्यकर्ते भासवून अशा गाईंची तस्करीही करीत आहेत. त्यांचा पोलीस प्रशासनाने तत्काळ शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर गोरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष राजा साळी, संजय कासोदेकर, मनीष चौधरी, दिनेश नेरपगार, देवेंद्र चौधरी, दीपक पवार, जांगीड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. या वेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी कार्यकर्त्यांना समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

Web Title: Action should be taken against those who injured cows and smuggled them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.