मद्य विक्री व वाहतूकप्रकरणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:38 IST2020-05-18T12:38:13+5:302020-05-18T12:38:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन काळात मद्यविक्री तसेच मद्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे़ शहादा ...

Action on sale and transportation of liquor | मद्य विक्री व वाहतूकप्रकरणी कारवाई

मद्य विक्री व वाहतूकप्रकरणी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊन काळात मद्यविक्री तसेच मद्याची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे़ शहादा आणि नंदुरबार येथे हा प्रकार घडला़
शहादा-शिरपूर रस्त्यावर सोनवद शिवारात ढाबा सुरु ठेवत त्यातून अवैध मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहादा पोेलीसांनी शनिवारी याठिकाणी छापा टाकला होता़ यावेळी ढाब्यातून २० हजार २७५ रुपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले़ यावेळी मद्यविक्री करताना आढळून आलेल्या यशवंत शांताराम चौधरी रा़ शहादा याच्याविरोधात पोलीस शिपाई विजय ढिवरे यांनी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान शनिवारी नंदुरबार शहरात धानोरा रस्त्यावर दारु वाहतूक करताना दोघा अज्ञात व्यक्तींवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून ५ हजार २०० रुपयांची देशी दारु व २५ हजार रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस शिपाई अनिल बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़
दरम्यान शुक्रवारी बसस्थानक परिसरात अवैध मद्य विक्री सुरु असल्याचे पोलीसांना दिसून आले होते़ येथून पोलीसांनी १४ हजार २८६ रुपयांच्या देशी विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या होत्या़
याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ एलसीबीचे पोलीस शिपाई अभय राजपूत यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन विवेक कैलास ठाकूर नामक युवकाविरोधात गुन्हा दाखल आहे़

शनिवारी सकाळी शहरातील अंधारे चौकात मास्कविना फिरणाऱ्या दिनेश शांताराम सूर्यवंशी रा़ वावद ता़ नंदुरबार, दिलीप लक्ष्मण चौधरी रा़ समशेरपूर ता़ नंदुरबार, यशवंत देवनाथ राजपूत रा़ राकसवाडे, शहर पोलीस ठाणे हद्दीत फिरणारे अशोक बापू शिंदे, साक्री नाका भागात विनोद अमृत चौधरी या जणांवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़
४तालुक्यातील सोनगीरपाडा बसस्थानकाजवळ मास्कविना फिरणाºया एकनाथ नामदेव गावीत याच्यावर पोलीसांनी केली़ त्याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Action on sale and transportation of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.