तळोद्यात बेेशिस्तांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:44 IST2021-02-05T12:36:10+5:302021-02-05T12:44:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील विविध भागांत रस्त्यांवर मोटारसायकली लावून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोटारसायकलस्वारांवर पोलिसांनी कारवाई करीत वाहने ...

तळोद्यात बेेशिस्तांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील विविध भागांत रस्त्यांवर मोटारसायकली लावून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोटारसायकलस्वारांवर पोलिसांनी कारवाई करीत वाहने जप्त केली. यातून पाचजणांकडून दंडाची वसुली करण्यात आली.
शहरातील स्मारक चाैक, आठवडे बाजार, मेन रोड, बसस्थानक रोड, हनुमान मंदिर या भागात वर्दळ असतानाही रस्त्यांवर मोटारसायकली लावून खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यातून मार्गावरील वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांमुळे मोठी वाहने निघण्यास अडचणी येत असल्याने अखेर नगरपालिका व वाहतूक पोलीस शाखा यांच्याकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. याअंतर्गत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांना थेट ट्रॅक्टरमध्ये उचलून ठेवत जप्त करण्यात आले. यांतील पाचजणांकडून दंडाची वसुली करण्यात आली. दरम्यान, यावेळी पालिकेच्या पथकाने रस्त्यांवर विविध वस्तू विक्री करणारे, रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान वाढविणारे, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई केली. यामुळे हातगाडीवर वस्तू विक्री करणाऱ्यांना शिस्त लागल्याचे दिसून येत आहे. या कारवाईत वाहतूक शाखेचे विलास पाटील यांच्यासह कर्मचारी तसेच नगरपालिकेच्या पथकातील कर्मचारी समाविष्ट होते. कारवाईनंतर स्मारक चाैक आणि इतर परिसर मोकळा होऊन रस्ता वाहतूक सुरळीत झाली होती.