२०३ गुन्ह्यात २२५ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:38 IST2020-06-09T11:38:07+5:302020-06-09T11:38:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांवर शहर पोलीस ठाण्यातर्फे गेल्या ...

२०३ गुन्ह्यात २२५ जणांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व नागरिकांवर शहर पोलीस ठाण्यातर्फे गेल्या तीन महिन्यात कारवाई करण्यात आली. तब्बल २०३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात येवून १२३ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
२४ मार्चपासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध प्रतिबंधात्मक आदेश देखील लागू करण्यात आले होते. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात विनामास्क फिरणे, विनाकारण दुचाकीवर शहरात फिरणे, दोन सीट दुचाकीवर फिरणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे यासह इतर कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी व पॉर्इंट लावण्यात आले होते. एकुण २०३ गुन्ह्यात २२५ जणांवर कारवाई करण्यात आली.
मार्च महिन्यात ३६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल महिन्यात ३९ केसेस करून ७८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मे महिन्यात ८१ केसेस करून ३४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तर जून महिन्यात आतापर्यंत ४७ केसेस करून १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
एकुण १२३ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ६३ गुन्हे शाबीत होऊन ७२ जणांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली. एकुण एक लाख ५३ हजार रुपये दंड आकारण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर व अधिकारी आणि कर्मचाºयांनी केली.