एका महिन्यात २१० आकडेबहाद्दरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:57 IST2020-02-08T12:56:57+5:302020-02-08T12:57:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाने गेल्या एका महिन्यात आकडी टाकून वीज चोरी करणाऱ्या २१० ...

एका महिन्यात २१० आकडेबहाद्दरांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाने गेल्या एका महिन्यात आकडी टाकून वीज चोरी करणाऱ्या २१० जणांवर कारवाई केली़ कंपनीने सातत्याने केलेल्या कारवायांमुळे वीज चोरी कमी झाल्याचा दावा केला असून येत्या काळातही कारवाई सुरु राहणार असल्याने वीज चोरांंचे धाबे दणाणले आहे़
वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागात धडगाव, तळोदा, अक्कलकुवा आणि शहादा हे चार तालुके समाविष्ट आहेत़ येथील तब्बल ६७ हजार ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत़ गेल्या काही वर्षात वीज चोरीवर आळा घालण्यासाठी कंपनीकडून वेळावेळी गावांमध्ये भेटी देऊन वीज जोडणी घेण्याबाबत आवाहन केले जात आहे़ यानंतरही काही ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघडकीस येत असल्याने कंपनीकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे़ यातून दंडाची वसुली करुन वीज चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ या कारवाईमुळे चारही तालुक्यातील वीज गळती कमी होऊन समतोल दाबाने वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे़ एकीकडे कारवाई सुरु असताना घरगुती आणि कृषीपंपांच्या थकबाकीबाबतही कंपनीकडून कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहेत़
तत्कालीन सरकारने कृषी क्षेत्रात वापरल्या गेलेल्या वीज बिलाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता़ हा निर्णय काही कालावधीपुरताच होता़ यामुळे येत्या काही दिवसात कृषीपंपांच्या वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे़ यातून ुपुन्हा शेतकरी आणि वीज कंपनी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ यावर तोडगा म्हणून शासनाने शेतकऱ्यांकडे थकीत असलेले वीज बिल माफीची कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे़
४कंपनीने १ ते ३१ जानेवारी दरम्यान शहादा विभागात २१० जणांवर कारवाई करुन ३५ लाख रुपयांचा दंडही वसुल केला आहे़ दरम्यान २०१९ च्या अंतिम सहा महिन्यात कंपनीने १ हजार ३७५ जणांवर कारवाई करुन तब्बल दोन कोटी रुपयांची वसुली केल्याची माहिती देण्यात आली आहे़ दिवसेंदिवस कारवाईचा वेग वाढत असल्याने चारही तालुक्यातील वीज गळती कमी झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे़
४चारही तालुक्यांमध्ये तब्बल ६७ हजार घरगुती ग्राहक आहेत़ यातील किमान २० हजार ग्राहकांकडे तीन ते चार कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे़ दीर्घमुदत थकबाकीची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कंपनीकडून यंदा थकबाकीदारांच्या भेटी घेऊन वसुलीसाठी प्रयत्न सुरु आहेत़ कारवाई करुन वसुली करण्यापेक्षा कंपनीकडून सांमजस्याने वसुली करण्यावर अधिक भर दिला जात आहे़
४विभागातील चार तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य त्या क्षमतेचे ट्रान्सफार्मर देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे़ विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात चारही तालुक्यातील कोणत्याही गावात ब्लॅक आऊटसारखे प्रकार घडलेला नसल्याचाही दावा त्यांच्याकडून केला जात आहे़
४एकीकडे घरगुती वीज चोरी करणाºयांवर कारवाई होत असताना २६ हजार ७७५ कृषीपंप धारकांच्या अडचणींकडे लक्ष देण्याची मागणी आहे़ शहादा विभागात कृषीपंपधारकांकडे तब्बल ४१२ कोटी रुपयांचे वीजबील थकीत आहे़ या थकबाकीसाठी कंपनी प्रयत्नशील आहे़ परंतू शेतकºयांनी दीर्घकाळापासून असलेली ही बिले अंदाजित असल्याने शासनाकडून बिलांना माफी देण्यात यावी असा आग्रह धरला आहे़ शहादा आणि तळोदा या दोन तालुक्यातील बागायत शेतकºयांना गेल्या काही वर्षात अंदाजित बिले दिल्यामुळे त्यांच्याकडील थकबाकीचा आकडा हा फुगला आहे़ कंपनीकडे शेतकºयांनी काही अंशी भरणा केला असला तरी पुन्हा तीच गत झाल्याने आकडे फुगल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़