शहाद्यात १४ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:10 IST2020-03-15T13:10:19+5:302020-03-15T13:10:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र फिटनेस सर्टिफिकेट न घेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. १४ ...

शहाद्यात १४ वाहनांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र फिटनेस सर्टिफिकेट न घेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. १४ वाहने जप्त करण्यात आले आहेत.
न्यायालयाने मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाºया अवजड वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दरवर्षी घेणे बंधनकारक केले आहे. असे प्रमाणपत्र न घेणाºया वाहनावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन विभागाला दिले आहेत या आदेशानुसार आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक अनिल केदार नितीन सूर्यवंशी व अजय चौधरी यांनी शहादा प्रकाशा रस्त्यावर कारवाईला सुरुवात केली या कारवाईदरम्यान १४ वाहन चालक व मालकांकडे योग्यता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने सदर वाहने ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. ही कारवाई महिनाभर सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.