आक्राळे येथे एकावर कु:हाडीने जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:29 IST2019-07-22T12:29:42+5:302019-07-22T12:29:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील अक्राळे येथे एकाच्या डोक्यात कु:हाडीने घाव घालून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी ...

Acre at one place: A bone injury | आक्राळे येथे एकावर कु:हाडीने जीवघेणा हल्ला

आक्राळे येथे एकावर कु:हाडीने जीवघेणा हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील अक्राळे येथे एकाच्या डोक्यात कु:हाडीने घाव घालून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आह़े 
विश्वास देविदास पाटील रा़ आक्राळे यांचे भाऊ ज्ञानेश्वर यांना नरेश विजय पाटील, भगवान विजय पाटील, बबिताबाई विजय पाटील सर्व रा़ आक्राळे यांनी मारहाण केली होती़ याचा जाब विचारण्यासाठी विश्वास व ज्ञानेश्वर हे त्यांच्या आईसह नरेश पाटील यांच्या आक्राळे शिवारातील शेतात गेले होत़े याठिकाणी नरेश याने हातातील कु:हाड ज्ञानेश्वर पाटील यांच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत करत विश्वास पाटील व त्यांच्या आईस मारहाण केली़ याप्रकरणी विश्वास पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल बागल करत आहेत़ अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी येथे भेट दिली होती़ 
 

Web Title: Acre at one place: A bone injury