दारु बनविण्याचे दहा लाखांचे साहित्य हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:53 IST2019-05-05T18:52:48+5:302019-05-05T18:53:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खापर : येथील बाजार पेठेतील एका दुकानावर राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार विभागाने धाड टाकून महुफुल, काळा ...

दारु बनविण्याचे दहा लाखांचे साहित्य हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : येथील बाजार पेठेतील एका दुकानावर राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार विभागाने धाड टाकून महुफुल, काळा अखाद्य गुळ, नवसागर हे गावठी दारू बनविण्याचे साहित्य मोठय़ा प्रमाणावर हस्तगत केले आहे. या गुन्ह्यात राहुल गौतमचंद जैन यास अटक करण्यात आली आहे.
खापर गावातील मेनरोडवरील दुकानावर मोठय़ा प्रमाणावर गावठी दारू बनविण्याचे साहित्य असल्याच्या गुप्त माहिती आधारे भरारी पथकाने धाड टाकली असता अवैध हातभट्टी दारू करीता लागणारा महुफुलसाठा अंदाजे 40 किलो क्षमतेच्या एकूण 526 गोण्या महुफुलाने भरलेल्या, नवसागराचे 393 बॉक्स (11 हजार चार) वडय़ा, ज्ॉगरी पावडर 30 किलो क्षमतेच्या 16 गोण्या, 11 किलो क्षमतेच्या अखाद्य काळ्या गुळाच्या 300 भेल्या, पाच किलो क्षमतेचा पातळ अखाद्य काळ्या गुळाच्या 53 पिशव्या, 22 पत्री ड्रम 50 लिटर मापाचे 10 लाख 22 हजार 370 किमतीचा मुद्देमाल दारूबंदी गुन्ह्याकामी जप्त करणेत आला आहे. हा मुद्देमाल हातभट्टी दारूनिर्मितीसाठी वापरात येत असल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाहीत विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक प्रसाद सुव्रे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक मनोज संबोधी, निरीक्षक खेडदिगर अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील, जवान अजय रायते, हशील नांद्रे, हंसराज चौधरी, वाहनचालक धनराज पाटील यांनी केली.
गुन्ह्याचा तपास नंदुरबार भरारी पथक निरीक्षक मनोज संबोधी करीत आहेत. खापर येथे यापूर्वीही अशीच धाड टाकून मोठय़ा प्रमाणावर महुफुल, काळा गुळ, नवसागर जप्त करण्यात आला होता. परंतु आतार्पयतच्या कार्यवाहीत ही सर्वात मोठी कार्यवाही असून, संबंधीत दुकानदाराचे महुफुल विक्रीचे लायसन्स आहे. तर एवढा माल ठेवता येतो का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या दुकानदाराकडे आलेला महुफुल अधिकृत की, अनाधिकृत त्याने हा माल कुठून मागविला व कुठे विक्री करणार होता याचा छडा लावणे गरजेचे आहे.