बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्ष सक्तमजुरी
By Admin | Updated: January 23, 2017 22:01 IST2017-01-23T22:01:26+5:302017-01-23T22:01:26+5:30
लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला

बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्ष सक्तमजुरी
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 23 - लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोनखडका, ता.नवापूर येथे मे २०१० मध्ये ही घटना घडली होती.
सोनखडका, ता.नवापूर येथील अल्पवयीन मुलगी सुटीनिमित्त एप्रिल व मे २०१० मध्ये गावी आली होती. या दरम्यान तिला घराशेजारीच असणारा फिलीप वंजी गावीत याने लग्नाचे अमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले. या दोन महिन्यात तिच्यावर फिलीप याने वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतर फिलीप याने लग्नास नकार दिला.
याप्रकरणी मुलीने नवापूर पोलीस ठाण्यात फिलीप गावीत याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यासंदर्भातील खटला जिल्हा सत्र न्यायालयात चालला. सरकारपक्षातर्फे फिर्यादी, धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, नवापूर रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी आदींसह इतरांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मेडीकल रिपोर्ट व इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधिश प्राची कुलकर्णी यांनी फिलीप गावीत यास सात वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड, कलम ४१७ अन्वये एक वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल निलेश बी.देसाई यांनी काम पाहिले.