अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:14 IST2019-04-12T12:14:09+5:302019-04-12T12:14:35+5:30

शोध सुरु : शहादा येथील घटना

The accused filed a case against the minor for abducting a minor | अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अल्पवयीन युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नंदुरबार : शहादा शहरातील कन्या विद्यालयात पेपर देण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन युवतीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना सोमवारी घडली होती़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
सावखेडा ता़ शहादा येथील 17  वर्षीय विद्यार्थिनी शहाद्यातील कन्या विद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत़े सोमवारी पेपर असल्याने ती शहाद्यात आली होती़ पेपर दिल्यानंतर युवती घरी न पोहोचल्याने तिच्या पालकांनी शहाद्यात येऊन तपास केला होता़ यावेळी ती मिळून आली नाही़ त्यांनी शहादा आणि तालुक्यात  तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून न आल्याने  पालकांनी पोलीसात धाव घेत माहिती दिली होती़ 
युवतीच्या आईने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़ पोलीसांकडून युवतीचा शोध सुरु आह़े 
 

Web Title: The accused filed a case against the minor for abducting a minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.