अपघातात दोषी बस चालकाला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:56 IST2019-05-11T11:56:11+5:302019-05-11T11:56:32+5:30

तळोदा न्यायालय : पादचाऱ्याला एस.टी.बसने दिली होती धडक

Accused bus driver imprisonment in accident | अपघातात दोषी बस चालकाला कारावास

अपघातात दोषी बस चालकाला कारावास


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पादचाºयास धडक देवूून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एस.टी.बस चालकास दोन वर्ष कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा तळोदा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली.
तळोदा ते खर्डी रस्त्यावर राणीपूर फाट्यानजीक १४ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. तळोदाकडून राणीपूरकडे जाणारी एस.टी.बसने रायसिंग काळू पाडवी (६८) रा.सावरपाडा, ता.तळोदा यांना मागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना सोमा वस्ता मोरे, रा.खर्डी, ता.तळोदा यांच्या समोर घडली होती. मोती प्रताप पाडवी हे देखील तेथे थांबले. त्यांनी रायसिंग यांना ओळखले व सावरपाडा येथे निरोप दिला.
अपघात केलेल्या बसचा तपास केला असता (बस क्रमांक एमएच २०- बीएल १३८९) त्यावरील चालक दिलवरसिंग रमणसिंग पाडवी, रा.गणेश बुधावल, ता.तळोदा यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी सोमा मोरे यांच्या फिर्यादीवरून चालक दिलवरसिंग पाडवी यांच्याविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हवालदार महेंद्र जाधव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तळोदा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.जी.मोरे यांच्या समोर हा खटला चालला.
चालक दिलवरसिंग पाडवी यांना दोषी धरत त्यांना दोन वर्ष साधी कैद आणि हजार रुपये दंडाची तर दुसºया एका कलमाअंतर्गत तीन महिने साधी कैद आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.धिरजसिंह चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार अनंत गावीत होते.

Web Title: Accused bus driver imprisonment in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.