दरोड्याच्या गुन्ह्यासह घरफोडीतील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:39 IST2020-05-24T12:39:48+5:302020-05-24T12:39:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींसह दोन घरफोडींमधील आरोपींना ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश ...

Accused of burglary arrested with the crime of robbery | दरोड्याच्या गुन्ह्यासह घरफोडीतील आरोपी जेरबंद

दरोड्याच्या गुन्ह्यासह घरफोडीतील आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींसह दोन घरफोडींमधील आरोपींना ताब्यात घेण्यास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश मिळाले. या गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील धरमदास मंगळू पाटील यांच्यावर गावाच्या शिवारातील शेतात १० ते १२ जणांच्या जमावाने दगड, लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला होता. त्यांच्याकडून तीन हजार ५०० रुपये रोख व दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता. हा प्रकार दरोड्याचा असल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एलसीबीला सुचना दिल्या होत्या.
एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांनी एक अधिकारी व दहा पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमून तपास सुरू केला, मात्र धागेदोरे मिळत नव्हते. अशातच २२ मे रोजी नवले यांना या गुन्ह्यातील संशयीत परिवर्धा व औरंगपूर येथीलच असल्याचे समजले. त्यांनी पथकाला लागलीच तेथे पाठविले.
राजेश ठाकरे, हेमराज गणपत न्हावी व बाजीगर सुरेश पवार यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यांच्यासोबतच्या इतर साथीदारांची नावे देखील समोर आली असून सर्व औरंगपूर परिसरातीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे.
दुसºया घटनेतील आरोपी व त्याच्याकडून मुद्देमाल घेणाºया तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहादा येथील वृंदावन कॉलनीत राहणारे महेश पंडित जव्हेरी यांच्या उघड्या घरातून चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी दहा हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत व मोबाईल चोरीस गेला होता. यातील संशयीत हा कमी किंमतीत मोबाईल विक्री करीत असल्याची माहिती निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली असता त्यांनी उंटावद शिवारातील झोपडपट्टीत पथकाला पाठविले. पथकाने डमी ग्राहक पाठवून प्रकाश विजय पावरा, रा.तोरमाळ यास ताब्यात घेतले. त्याने मोबाईल शहादा येथील दोघांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी समीर शहाद महोमद शहा व वसीमखान जहीरखान रा.शहादा यांना ताब्यात घेतले. प्रकाश पावरा याने वृंदावन कॉलनीतील चोरीतील मोबाईल असल्याची कबुली दिली.
तिसरी चोरीची घटना शहाद्यातीलच खरेदी विक्री संघाच्या दुकान संकुलातील उघडकीस आली. बाजार परिसरात अल्पवयीन बालकाकडे महागडा मोबाईल असल्याने त्याला विचारणा केली असता त्याने दुकानातून मोबाईलची चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार दिपक गोरे, प्रमोद सोनवणे, विकास अजगे, विकास कापुरे, मोहन ढमढेरे, विजय ढिवरे, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांच्या पथकाने केली. संशयीतांकडून इतरही गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

औरंगपूर येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयीत हे पुर्ण नियोजन करूनच गुन्हा करण्यासाठी निघाले होते. यातील तिघे एका ठिकाणी लग्नात असतांना त्यांना फोन करून बोलावून घेतले होते. त्यानंतर आधीच त्या ठिकाणी असलेले आठ ते नऊजण आणि हे तिघे अशा १२ जणांनी थेट शेतकरी दाम्प्त्यावर हल्ला केला होता. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

Web Title: Accused of burglary arrested with the crime of robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.