पोलिसांच्या तावडीतून फरार आरोपीस गुजरातमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST2021-04-26T04:27:10+5:302021-04-26T04:27:10+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक रोजी ६ एप्रिल २०२१ रोजी अक्कलकुवा न्यायालयात मोलगी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी ...

Accused absconding from police custody arrested from Gujarat | पोलिसांच्या तावडीतून फरार आरोपीस गुजरातमधून अटक

पोलिसांच्या तावडीतून फरार आरोपीस गुजरातमधून अटक

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक रोजी ६ एप्रिल २०२१ रोजी अक्कलकुवा न्यायालयात मोलगी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी दिनेश रायसिंग वळवी रा. वलंबा यास सुनावणीकामी आणले होते. त्यावेळी न्यायालयाच्या आवारातून पोलीस पथकाची नजर चुकवून बेडीसह तो पळून गेला होता.

सदर आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना आदेशित केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजपूत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तीन पथके तयार करून आरोपीचा ठावठिकाणा काढण्यासाठी तपास सुरू केला. गोपनिय बातमीदार सक्रिय केले. गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पथक पाठविले. हवालदार सजन वाघ, विकास अजगे, किरण पावरा यांच्या पथकाने भेस्तान, जि. सुरत येथे जाऊन माहिती मिळवून शिताफीने सापळा रचून जेरबंद केले. आरोपीला अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कारवाईमुळे पोलीस अधीक्षकांनी पथकाचे अभिनंदन केेले.

Web Title: Accused absconding from police custody arrested from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.