पळासवाडे येथील तरुणाचा आफ्रिकेत अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:37 IST2019-07-21T12:37:30+5:302019-07-21T12:37:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आफ्रिकेत नोकरीसाठी कार्यरत असलेल्या पळासवाडे, ता.शहादा येथील अभियंता तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ...

Accidental death in Africa in Palaswade | पळासवाडे येथील तरुणाचा आफ्रिकेत अपघाती मृत्यू

पळासवाडे येथील तरुणाचा आफ्रिकेत अपघाती मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आफ्रिकेत नोकरीसाठी कार्यरत असलेल्या पळासवाडे, ता.शहादा येथील अभियंता तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आपल्या गावी आणण्यात येत असून रविवार, 21 जुलै रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पळासवाडे येथील हर्षल उद्धव पाटील (28) हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर आफ्रिकेतील ओकारा या शहरात एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीला होता. गेल्यावर्षीच त्याचे लगA झाले होते. लगAानंतर पती-पत्नी दोन्ही आफ्रिकेत होते. 14 जुलै रोजी ते आफ्रिकेतील समुद्र किना:यावरील ब्ल्यू डायमंड पॉईंट येथे सहलीसाठी गेले असता समुद्राच्या लाटेतच हर्षल पाटील हे समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. त्यात त्यांचा  मृत्यू झाला. सर्व सोपस्कारानंतर त्यांचा मृतदेह शनिवारी आफ्रिकेतून भारतात आणण्यात आला असून रविवारी सकाळी त्यांच्यावर पळासवाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते उद्धव लक्ष्मण पाटील यांचे पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, मेहुणे असा परिवार आहे.
 

Web Title: Accidental death in Africa in Palaswade