अक्कलकुव्यात चारचाकीवर दुचाकी धडकल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:06 IST2019-03-27T21:05:51+5:302019-03-27T21:06:13+5:30
१० जण जखमी : अक्कलकुवा येथे राज्यमार्गावरची घटना

अक्कलकुव्यात चारचाकीवर दुचाकी धडकल्याने अपघात
नंदुरबार : चुकीच्या बाजूने दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहनास धडक दिल्याने १० जण जखमी झाले़ हा अपघात २० मार्च रोजी अक्कलकुवा शिवारात घडला़
बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावर २० मार्च रोजी पंकज केसरसिंग वसावे रा़ पिंप्रीपाडा ता़ सागबारा याने रस्त्याच्या उजव्या बाजूने दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या प्रवासी वाहनाला धडक दिली होती़ यामुळे आत बसलेले प्रवासी एकमेकांवर आदळले जाऊन जखमी झाले होते़ तसेच दुचाकीस्वार पंकज हाही जखमी झाला होता़ जखमींवर उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते़ यात पंकज वसावे हा दोषी आढळून आल्याने पोलीस नाईक विनायक निकाळजे यांच्या फिर्यादीवरुन पंकज वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़