लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान जामली फाटय़ाजवळील फरशी पुलाचा भराव व रस्ता खचल्यामुळे कपडय़ांच्या गाठी वाहून नेणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मालेगाव येथून राजस्थानमधील बलोत्रा येथे कपडय़ांच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच. 18 बीजे- 4156) बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान जामली फाटय़ाच्यापुढे अक्कलकुवाच्या दिशेने असणा:या फरशी पुलाजवळ आला. त्याचवेळी समोरून अवजड सामग्री घेऊन जाणारे कंटेनर आले. फरशी पुलावरून ट्रक व कंटेनर एकाचवेळी निघू न शकत असल्याने चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. त्याचवेळी फरशी पुलाच्या कडेला असणारा रस्ता व भराव खचला. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. ट्रक उलटल्याने ट्रकमधील कापडाच्या गाठी बाहेर फेकल्या जाऊन त्यांचे नुकसान झाले. या अपघातात मोठी जीवितहानी झाली असती. ट्रक चालक परशुराम नेमकर व सहचालक किरण मासुळे यांना मुका मार लागून ते किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र या अपघातात ट्रकचे व त्यातील कापडाचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी सकाळी क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे प्रय} करण्यात आले.नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड वाताहत झाली असून रत्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते अंकलेश्वर्पयत अपघाताची मालिका सुरू आहे. शनिवारी रस्त्यावरील खड्डय़ांमुळे औरंगाबाद-अहमदाबाद बस चालकाचे नियंत्रण सुटून खड्डय़ात उतरली होती. हे खड्डे मातीने बुजविण्यात आल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरते. भरधाव वेगाने धावणारी अनियंत्रित व ओव्हरलोड वाहने त्यातच धुळीचे व खड्डय़ांचे साम्राज्य यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जीवघेणी बनली आहे. मात्र संबंधित विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.
रस्ता खचल्यामुळे ट्रक उलटून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:34 IST