शहादा-लोणखेडा बायपासवर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 12:55 IST2019-02-20T12:55:12+5:302019-02-20T12:55:42+5:30

ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जखमी

Accident on Shahada-Lonkheda Bypass | शहादा-लोणखेडा बायपासवर अपघात

शहादा-लोणखेडा बायपासवर अपघात

शहादा : लोणखेडा वळणरस्त्यावर पपई घेऊन जाणा:या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती पत्नी जखमी झाल़े यातील पतीची प्रकृती गंभीर असून त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालायत हलवण्यात आले आह़े
पाडळदा येथील मोहन तुकाराम पाटील हे पत्नी अनिता यांच्यासह नवीन मोटारसायलकने शहादा येथून मामाचे मोहिदे गावाकडे जात असताना वळणरस्त्यावरील मोहिदा चौफुलीजवळ त्यांना मागून येणा:या आरजे 09 जीबी 8018 या ट्रकने त्यांना मागून धडक दिली़ यात दोघेही रस्त्याखाली फेकले गेल़े मोहन पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाल़े याठिकाणी सलग अपघात होऊनही संबधित विभागाने दुर्लक्ष केले आह़े 
 

Web Title: Accident on Shahada-Lonkheda Bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.