ट्रक टर्मिनसजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:29 IST2019-12-20T11:26:16+5:302019-12-20T11:29:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वळणरस्त्यावर ट्रक टर्मिनसजवळ अपघात मालिका सुरुच असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील दोन ...

ट्रक टर्मिनसजवळ अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील वळणरस्त्यावर ट्रक टर्मिनसजवळ अपघात मालिका सुरुच असून गुरुवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील दोन ट्रकांमध्ये समोरासमोर धडक होऊन एक जण जखमी झाला़ ट्रक टर्मिनस समोरच्या वळणावर उपाययोजना करण्याची मागणी करुनही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती़
गुजरात राज्यातील जुनागढ येथून नंदुरबार मार्गाने साक्रीकडे जाणाऱ्या जीजे ०१ बीवाय ५०४८ या ट्रकला शहरातील वळणरस्त्यावर विलासराव देशमुख ट्रक टर्मिनससमोर भरधाव वेगात येणाºया एमएच १५ बीव्ही ५५८० या ट्रकने धडक दिली़ धडकेत दोन्ही ट्रकच्या केबीनचा अक्षरश: चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले़ यात राजूभाई सरिया रा़ जुनागढ हे जखमी झाले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एमएच १५ बीव्ही ५५८० ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पहाटे घडलेल्या घटनेनंतर जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले़
ट्रक टर्मिनससमोरील वळण धोकेदायक ठरत असल्याने याठिकाणी उपाययोजनांची मागणी आहे़ परंतू कारवाई अद्याप झालेली नाही़ रस्ता बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाकडे असूनही अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत़ जगतापवाडी चौक ते जाणता राजा चौका दरम्यान गतिरोधक व इतर सुरक्षा उपाय नागरिकांनी सुचवले होते़