समशेरपूर फाट्याजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:01 IST2020-11-18T12:00:57+5:302020-11-18T12:01:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रकाशा रस्तावरील समशेरपुर ता. नंदुरबार येथील साखर कारखान्याजवळ दोन कार एकमेकांवर धडकून अपघात झाल्याची ...

समशेरपूर फाट्याजवळ अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रकाशा रस्तावरील समशेरपुर ता. नंदुरबार येथील साखर कारखान्याजवळ दोन कार एकमेकांवर धडकून अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. घटनेत सहा जण जखमी झाले आहेत.
नंदुरबार तालुक्यातील धुळवद येथील सहा जण एमएच १५ एबी ९६८४ या वाहनाने शहाद्याकडे जात होते. दरम्यान समशेरपूर शिवारात नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान यावल फाट्याकडे एमएच १८-९७३४ ही कार निघाली होती. दरम्यान दोन्ही फाट्याजवळ एकमेकांवर धडकून अपघात झाला. धडक दिल्यानंतर धुळवदकडून येणारे वाहन लगतच्या चारीत उलटल्याने आतील सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नंदुरबार येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान याबाबत मंगळवारीही नाेंद करण्यात आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
भाऊबीजेनिमित्त गावी परतणा-या नागरीकांची सोमवारी वर्दळ होती. प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी होती. त्यातच हा अपघात घडला. परिसरातील नागरीकांनी बचावकार्य केले.