Accident due to truck collision on transformer near light | प्रकाशाजवळ ट्रान्सफार्मरवर ट्रक आदळल्याने अपघात
प्रकाशाजवळ ट्रान्सफार्मरवर ट्रक आदळल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : राजकोट येथून शहाद्याकडे जाणारा ट्रक शेताच्या बांधावर आदळून अपघात झाल्याची घटना प्रकाशा-डामरखेडा दरम्यान घडली.
याबाबत वृत्त असे की, शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास राजकोट येथून आंध्र प्रदेशकडे जाणारा मालवाहतूक ट्रक (क्रमांक ए.पी.३९ -३९५९) प्रकाशा गावाजवळ ओव्हरटेक करीत असताना उजव्या बाजूच्या चारीत जाऊन आदळला. शेताच्या बांधावर असलेल्या विजेच्या ट्रान्सफार्मरवर हा ट्रक अडकला. मात्र वीजपुरवठा नसल्याने दुर्घटना टळली. या अपघातात चालक सूरी बाबू व क्लिनर रामकृष्णण हे किरकोळ जखमी झाले आहेत. प्रकाशा येथील दूरक्षेत्राचे पोलीस व वीज कर्मचाऱ्यांनी भेट देऊन या अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Accident due to truck collision on transformer near light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.