पुणे-अक्कलकुवा बसला मनमाडजवळ अपघात, 20 प्रवासी किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:27 IST2019-11-11T12:27:02+5:302019-11-11T12:27:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुणे- अक्कलकुवा बसला मनमाड जवळच्या अनकवाडे शिवारात आज सकाळी अपघात झाला. 20 प्रवासी किरकोळ ...

पुणे-अक्कलकुवा बसला मनमाडजवळ अपघात, 20 प्रवासी किरकोळ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पुणे- अक्कलकुवा बसला मनमाड जवळच्या अनकवाडे शिवारात आज सकाळी अपघात झाला. 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले. अक्कलकुवा आगार प्रमुखांनी मनमाड आगार प्रमुखांशी संपर्क साधून माहिती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर - पुणे महामार्गाची दुरावस्था झाली असून खड्डे चुकवितांना चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात गेल्याने हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 40 प्रवासी होते. त्यापैकी 18 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अपघात होताच प्रवाशांनी आरडाओरडा केल्यामुळे अनकवाड़े गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.