मालदा गावात अनोळखींना प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:59 IST2020-03-25T13:59:13+5:302020-03-25T13:59:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील मालदा येथे परगावाहून येणाऱ्या नागरिकांना व फेरीवाल्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ...

मालदा गावात अनोळखींना प्रवेश बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील मालदा येथे परगावाहून येणाऱ्या नागरिकांना व फेरीवाल्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर रोजगारासाठी बाहेर गेलेल्यांना तपासणी करून रिपोर्ट दाखविल्याशिवाय गावात प्रवेश देण्यात येणार नाही, असा ठराव करण्यात आला आहे.
दरम्यान, एकाही व्यक्तीने बाहेरगावी जाऊ नये, नातेवाईकांना गावात बोलवू नये, लग्न समारंभ व उत्तरकार्या सारखे मोठे कार्यक्रम न घेण्याचा ठरावही सर्वानुमते करण्यात आला.
या वेळी गोपी पावरा, सखाराम ठाकरे, पोलीस पाटील मदन पावरा, सोनू पावरा, संजय खर्डे, राहुल खर्डे, दिनेश खर्डे, कल्याण खर्डे, अंबालाल वळवी, प्रकाश खर्डे, दीपक खर्डे, शंकर ठाकरे, हरीश खर्डे, पवन खर्डे, धोनु खर्डे, युवराज वळवी इत्यादी युवक एकत्र येऊन कोरोनाशी दोन हात करतांना दिसत आहे, अशी भूमिका अन्य गावातील तरूणांनीदेखील घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.