खरीपाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:20 IST2020-06-18T12:20:03+5:302020-06-18T12:20:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरीवर्ग खरिपाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. शहादा तालुक्यात ...

Accelerate kharif preparations | खरीपाच्या तयारीला वेग

खरीपाच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरीवर्ग खरिपाच्या तयारीमध्ये गुंतला आहे.
शहादा तालुक्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बागायती पिकांना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची पसंती आहे. एकूणच मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीला वेग दिला आहे. कोरोनाच्या महामारीपासून बचाव होण्याकरिता कृषी विभागाने थेत खते व बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहोचवला पाहिजे अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
देशात सर्वत्र कोरोनामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी सुरू होती. या दरम्यान अनेक शेतकºयांच्या शेतातील असलेल्या केळी व पपई या नाशवंत वस्तू झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे नागरिक आपापल्या गावी घरी बसून आहेत. सद्य:स्थितीत खरीप हंगामाला सुरूवात झालेली आहे. शेतकºयांनी नांगरणी वखरणी केली असून, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे काही भागात समाधान कारक पाऊस झाल्याने पेरणीला सुरूवात झाली आहे. खरीप हंगामातील कापूस, मका यासह विविध पिकांची पेरणी करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकºयांना खते व बियाणे घेण्याकरिता शहरातील खाजगी व खरेदी विक्री संघाच्या नियोजित जागेवर जावे लागत आहे. या ठिकाणी खते व बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकºयांची गर्दी होते.
अशा परिस्थितीमध्ये शेतकºयांचा कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी शहादा तालुका कृषी विभागाने शेतकºयांच्या शेताच्या बांधावर बी-बियाणे व खतांचा पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी ईश्वर माळी यांनी केली आहे. शहादा तालुक्यात एकेकाळी ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येत होते मात्र मध्यंतरी पावसाचा खंड पडल्याने व कुपनलिका ही आटल्या होत्या. तसेच लिफ्ट योजनाही बंद झाल्याने बहुतांश शेतकºयांनी उसाची लागवड करणे बंद केले. सध्या कापसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदा ८१ हजार ८०७ हेक्टरवर खरिपाची लागवड होणार आहे. त्यात कापूस ५० हजार ९२२, सोयाबीन पाच हजार १००, ज्वारी दोन हजार ५००, मका आठ हजार ८९१, कडधान्य तीन हजार ८०० तर केळी व पपई प्रत्येकी दोन हजार ५०० हेक्टरवर लागवड होणार आहे.
कृषी विभागामार्फत खते व बियाण्यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होणार असून शेतकºयांनी बियाणे पेरणी अगोदर त्याची उगवण क्षमता घरच्याघरी तपासून पहावी त्यानंतरच पेरणी करावी असे, आवाहन करण्यात आले आहे. तसेच कापूस व मका या पिकांवर येणाºया गुलाबी व लष्करी बोंड आळी संदर्भात कृषी विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांनी वेळीच जागृत होऊन बोंड आळीचा नायनाट करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी केले आहे. त्याच बरोबर बांधावर खत या योजनेंतर्गत शेतकºयांनी गटामार्फत एकत्रित येऊन नोंदणी केल्यास कृषी विभागामार्फत घरपोच खत करण्यात येईल. त्यासाठी गावातील कृषी सहाय्यकांकडे गटाची एकत्रित मागणी नोंदविणे आवश्यक आहे.

Web Title: Accelerate kharif preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.