पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करुन अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:51 IST2019-11-05T12:51:25+5:302019-11-05T12:51:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नाशिक येथील सासर तर नंदुरबार शहरातील माहेर असलेल्या विवाहितेसोबत पतीने वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करुन ...

पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करुन अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नाशिक येथील सासर तर नंदुरबार शहरातील माहेर असलेल्या विवाहितेसोबत पतीने वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करुन छळ केल्याचा प्रकार पिडितेने दिलेल्या फिर्यादीनंतर समोर आला़ माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत यासाठी हा छळ करण्यात आला होता़
शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा नाशिक येथील दिपक किशोर आहुजा याच्यासोबत 2010 मध्ये झाला होता़ विवाहानंतर पत्नीने पत्नीने माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी पती दिपक हा छळ करत होता़ यादरम्यान त्याने पिडितची इच्छा नसताना जबरदस्तीने वेळावेळी तिच्यासोबत अनैसर्गिक पद्धतीने संभोग करुन अत्याचार केला होता़ दरम्यान पिडितेचा रवि आहुजा या दिराकडून वेळावेळी विनयभंग होत होता़ याबाबत तक्रार करुनही सासरच्यांनी दुर्लक्ष करत त्रास देणे सुरुच ठेवले होत़े या काळात गर्भवती असताना सासू मिना आहुजा हिने अज्ञात गोळी देऊन गर्भपात घडवून आणला होता़ जून 2019 र्पयत हा प्रकार सुरु होता़ पिडित महिलेला घरातून शिवीगाळ व मारहाण करुन हाकलून दिल्यानंतर ती माहेरी आली होती़
दरम्यान माहेरी आल्यानंतरही पतीसह सासरच्यांनी येथे येऊन दमदाटी केल्याने त्रस्त झालेल्या पिडितेने रविवारी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दिपक आहुजा, सासरे किशोर रुपचंद आहुजा, मिना, रवि किशोर आहूजा, सिमरन रवि आहुजा, विजय रामचंद्र निचाणी सर्व रा़ नाशिक व सखुबाई रमेशलाल फेरवाणी रा़ इंदौर अशा सात लोकांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करत आहेत़