तळोदा व नंदुरबारातील घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:38 IST2019-05-09T11:37:46+5:302019-05-09T11:38:14+5:30

सुरत येथे घेतले ताब्यात : एलसीबीची कारवाई

The absconding accused in the robbery of Taloda and Nandurbar have been arrested | तळोदा व नंदुरबारातील घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

तळोदा व नंदुरबारातील घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

नंदुरबार : घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपीस दोन वर्षानंतर ताब्यात घेण्यास एलसीबीला यश आले. गणेश दिलीप पाडवी (३०) रा.भवर, ता.तळोदा असे संशयीताचे नाव आहे.
तळोदा पोलीस ठाणे व नंदुरबार पोलीस ठाणे अंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्यातील गणेश पाडवी हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. तो सुरत येथील सचिन परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला मिळाली. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली व एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक भगवान कोळी यांच्या सुचनेनुसार पथकाने सुरत येथे सचिन परिसरात सापळा रचला. तेथे तो पथकाच्या ताब्यात आला. त्याने दोन घरफोड्या केल्याची माहिती दिली.
चोरीतील ऐवज त्याने त्याच्या घरातून काढून दिला. २०१२ मध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाणेअंतर्गत ठरफोडी व चोरीच्या अनेक गुन्ह्यात त्याचा समावेश होता. नंदुरबार कोर्टाचे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट प्रलंबीत आहे.
ही कारवाई पोलीस नाईक राकेश मोरे, हवालदार आनंदा मराठे, अभय राजपूत, सतिष घुले यांनी केली. तो आणखी काही घरफोडींचा गुन्हा कबुल करण्याची शक्यता आहे.

Web Title: The absconding accused in the robbery of Taloda and Nandurbar have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.