प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:09 IST2019-07-16T13:09:23+5:302019-07-16T13:09:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येऊन धरणे आंदोलन ...

Aanganwadi Sevaks' Front for Pending Requests | प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येऊन धरणे आंदोलन करण्यात आल़े प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता़ 
दुपारी 12 वाजता शहरातील नवापुर चौफुलीपासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयात सेविकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल़े यानंतर मोर्चा जिल्हा परिषदेकडे मार्गस्थ झाला़ जि़प प्रवेशद्वारासमोर सेविकांनी धरणे आंदोलन करत प्रश्न सुटेर्पयत सुरु ठेवण्याचा आग्रह धरला होता़ यावेळी प्रशासकीय अधिका:यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल़े यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात, नवसंजीवनी सदस्य गाभा समिती व विविध सेवाभावी संस्थांकडून सेविकांना दिल्या जाणा:या त्रासावर तोडगा काढावा, स्वयंसेवी संस्थांना परवानगीशिवाय अंगणवाडी केंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये, सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे प्रलंबित एकरकमी पेन्शन योजनेचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, अमृत आहार योजनेचे पैसे संपले असताना आहार सुरु ठेवण्याची सक्ती थांबवावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या़  जिल्ह्यातील सेविकांनी मोर्चात हजेरी लावली़ 

Web Title: Aanganwadi Sevaks' Front for Pending Requests