दारूच्या नशेत एकाने बालकासह दोघांना घेतला चावा
By मनोज शेलार | Updated: April 6, 2023 18:35 IST2023-04-06T18:34:49+5:302023-04-06T18:35:03+5:30
दारूच्या नशेत एकाने दोघांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना तळोदा येथे घडली. याबाबत तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूच्या नशेत एकाने बालकासह दोघांना घेतला चावा
नंदुरबार :
दारूच्या नशेत एकाने दोघांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना तळोदा येथे घडली. याबाबत तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार रमेश ठाकरे (३७, रा. मोड, ता. तळोदा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, तळोदा येथील टेंबारी हट्टी भागात कुमार ठाकरे हा दारू पिऊन परिसरात फिरत होता. त्यावेळी तेथे असलेले संतोष साकऱ्या पाडवी (५५) व रॉकी कुमार ठाकरे (दोन वर्षे) यांना त्याने चावा घेतला. त्यात ते जबर जखमी झाले. याबाबत संतोष साकऱ्या पाडवी यांनी फिर्याद दिल्याने कुमार रमेश ठाकरे याच्याविरुद्ध तळोदा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सागर गाडीलोहार करीत आहेत.
या घटनेनंतर परिसरात चावा घेणारी व्यक्ती फिरत असल्याची अफवा पसरली. त्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण होते. दरम्यान, पोलिसांनी परिसरात फिरून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.