95 लाख फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:04 IST2019-09-10T12:04:03+5:302019-09-10T12:04:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतात पॉली हाऊस बनवून देण्याच्या नावाखाली 95 लाख 50 हजारात तीन शेतक:यांची फसवणूक केल्याप्रकरणाचा ...

95 लाख फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतात पॉली हाऊस बनवून देण्याच्या नावाखाली 95 लाख 50 हजारात तीन शेतक:यांची फसवणूक केल्याप्रकरणाचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती पहाता लवकरच संबधीत संशयीतांना अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मालेगाव येथील तिरुपती इरिगेशन संस्थेने नवापूर येथील तीन शेतक:यांना शेतात पॉली हाऊस बनवून देण्याचे सांगितले. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधून 95 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज देखील मंजुर करून दिले. परंतु काम न करता संस्था पसार झाली. याप्रकरणी पुष्पा गावीत या शेतकरी महिलेने फिर्याद दिल्याने संस्थाचालक आणि बँकेच्या तत्कालीन आणि विद्यमान शाखा व्यवस्थापकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची व्याप्ती आणि फसवणूक झालेली रक्कम पहाता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्यातील रक्कम, त्याची व्याप्ती पहाता आणि कोण कोण यात गुंतले आहेत हे स्पष्ट होणार आहे. संशयीत आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.