कुपोषित बालकांच्या मान्सूनपूर्व तपासणीसाठी 93 पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:11 IST2019-04-12T12:10:44+5:302019-04-12T12:11:21+5:30
आढावा : धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात मोहिम

कुपोषित बालकांच्या मान्सूनपूर्व तपासणीसाठी 93 पथके तैनात
नंदुरबार : जिल्ह्यातील सॅम व मॅम बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महिला व बालविकास आणि आरोग्य विभागाने मान्सूनपूर्व तपासणी मोहिम हाती घेतली आह़े याअंतर्गत 93 वैद्यकीय पथके दुर्गम भागात तैनात झाली असून यातून कुपोषित बालकांची आकडेवारी नव्याने समोर येणार आह़े
अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अंगणवाडीनिहाय गरोदर माता, स्तनदा माता, 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी बालकांसोबत स्थलांतर करुन परत आलेल्या कुटूंबांचे योग्य पद्धतीने सव्रेक्षण करण्यासाठी मोहिम घेण्याचे नियोजन करण्यात आले होत़े यानुसार गेल्या आठवडय़ापासून दुर्गम भागात मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आह़े महिला व बालविकास विभागाच्या नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, मोलगी, पिंपळखुटा, नंदुरबार, रनाळा, धडगाव, खुंटामोडी, तोरणमाळ या 12 केंद्रनिहाय बालक व मातांचा शोध घेतला जाणार आह़े फेब्रुवारी अखेरीस नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व 12 प्रकल्पांमध्ये 5 हजार 791 कुपोषित बालकांची नोंद झाली होती़ वाढीस लागलेल्या या आकडेवारीच्या पाश्र्वभूमीवर लसीकरण आणि उपचार असा दुहेरी प्रयत्न यातून केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े