नंदुरबारात ९,२०० विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:04 IST2019-02-25T12:04:13+5:302019-02-25T12:04:25+5:30

६९ परीक्षा केंद्र : १२ केंद्रांवर कमी पडल्या प्रश्नपत्रिका, लागलीच केली गेली व्यवस्था

 9,200 students of Nandurbar had given scholarships | नंदुरबारात ९,२०० विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

नंदुरबारात ९,२०० विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

नंदुरबार : : पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील ६९ केंद्रांवर घेण्यात आली. जवळपास नऊ हजार २०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, परीक्षा परिषदेच्या घोळामुळे दोन दिवस आधी मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका व इतर साहित्य रविवारी सकाळी साडेसात वाजता शिक्षण विभागाला प्राप्त झाले. परिणामी धडगाव, तोरणमाळसारख्या केंद्रांवर प्रश्नपत्रिका वेळेत पाठविण्यासाठी कसरत झाली.
पाचवी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आल्या. जिल्ह्यातील एकुण ६९ परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा झाल्या. पाचवीच्या पाच हजार १२७ तर आठवीच्या चार हजार १८८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली.
नंदुरबार तालुक्यात पाचवीचे एक हजार ७५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी एक हजार ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ७८ विद्यार्थी गैरहजर होते. आठवीचे एक हजार ५४६ विद्यार्थी होते पैकी ६० गैरहजर होते तर एक हजार ४८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नवापूर तालुक्यातून पाचवीचे ६५९ विद्यार्थी होते पैकी १७ गैरहजर होोते ६४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आठवीचे ७४७ विद्यार्थ्यांपैकी २४ गैरहजर होते ७२३ जणांनी परीक्षा दिली. शहादा तालुक्यातून पाचवीचे एक हजार १९३ विद्यार्थी होते पैकी ५३ गैरहजर होते तर एक हजार १४० विद्यार्थी उपस्थित होते. आठवीचे एक हजार २३० विद्यार्थी होते. ४१ गैरहजर राहिले एक हजार १८९ उपस्थित होते. तळोदा तालुक्यात पाचवीचे ४२७ विद्यार्थ्यांपैकी १९ गैरहजर तर ४०८ हजर, आठवीचे २८७ पैकी सहा गैरहजर तर २८१ हजर होते. अक्कलकुवा तालुक्यात पाचवीच्या ५६७ विद्यार्थ्यांपैकी १८ गैरहजर तर ५४९ हजर होते. आठवीचे ३१९ पैकी २१ गैरहजर ततर २९८ हजर होते. धडगाव तालुक्यात पाचवीचे ७६४ विद्यार्थी हजर होते. पैकी ५४ गैरहजर तर ७१० जणांनी परीक्षा दिली. आठवीच्या २२२ विद्यार्थ्यांपैकी ११ गैरहजर होते २११ जणांनी परीक्षा दिली. एकुण पाचवीचे पाच हजार ३६६ विद्यार्थ्यांपैकी २३९ विद्यार्थी गैरहजर होते तर पाच हजार १२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आठवीचे एकुण चार हजार ३५१ विद्यार्थी होते पैकी १६३ गैरहजर राहिले तर चार हजार १८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
नंदुरबार तालुक्यात पाचवीचे १६ तर आठवीचे १२ परीक्षा केंद्र होते. नवापूर तालुक्यात पाचवीचे चार तर आठवीचे चार, शहादा तालुक्यात पाचवीचे सात तर आठवीचेही सात, तळोदा तालुक्यात पाचवीचे तीन तर आठवीचे दोन, अक्कलकुवा तालुक्यात पाचवीचे चार तर आठवीचे तीन व धडगाव तालुक्यात पाचवीचे सहा तर आठवीचे एक असे पाचवीचे ४० व आठवीचे २९ परीक्षा केंद्र होते.
सर्वत्र शांतेत आणि सुरळीत परीक्षा झाल्याचे जिल्हा परिक्षा नियंत्रक तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी व जिल्हा समन्वयक उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी सांगितले.

Web Title:  9,200 students of Nandurbar had given scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.