जैन कृषी तंत्र विद्यालयाचा ९१.५३ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:59+5:302021-08-14T04:35:59+5:30
प्रथम वर्षात मोहिनी दिलीप वळवी (९२.४२ टक्के) प्रथम, माधुरी रामसिंग तडवी (९१.९२ टक्के) व लक्ष्मी गोपाल वळवी (९१.९२ टक्के) ...

जैन कृषी तंत्र विद्यालयाचा ९१.५३ टक्के निकाल
प्रथम वर्षात मोहिनी दिलीप वळवी (९२.४२ टक्के) प्रथम, माधुरी रामसिंग तडवी (९१.९२ टक्के) व लक्ष्मी गोपाल वळवी (९१.९२ टक्के) द्वितीय तर सायबा सुभाष रावताळे (९१.६७ टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. द्वितीय वर्षात सुवर्णा सुभाष वळवी (८८.९६ टक्के) प्रथम, नमिता बारक्या पटले (८८.७५ टक्के) द्वितीय तर मनिता मानसिंग वसावे ८८.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. द्वितीय वर्षात ३५ विद्यार्थी प्रथम श्रेणी विशेष प्राविण्यात तर १६ विद्यार्थी प्रथम श्रेणी व तीन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार जैन, सचिव घनश्याम चौधरी, संचालक कुमारपाल जैन, प्राचार्य प्रवीण वसावे, प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दीपक मराठे, जितेंद्र वानखेडे यांनी कौतुक केले.