रसायनशास्त्र विषयावर कार्यशाळेत ९१ प्राध्यापकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:04+5:302021-05-28T04:23:04+5:30
शिक्षण व्यवस्था ही अधिक लवचिक व्हावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जॉब बदल झालेले आहेत याची माहिती मिळावी हा दृष्टीकोन कार्यशाळेचा ...

रसायनशास्त्र विषयावर कार्यशाळेत ९१ प्राध्यापकांचा सहभाग
शिक्षण व्यवस्था ही अधिक लवचिक व्हावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जॉब बदल झालेले आहेत याची माहिती मिळावी हा दृष्टीकोन कार्यशाळेचा होता. जळगाव येथील रसायनशास्त्र विभाग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.एस.एस. राजपूत यांनी विद्यार्थ्यांनी एम.एस्सी.च्या अभ्यासक्रमाबाबत प्रात्यक्षिकावर जास्त भर देऊन सखोल ज्ञान घ्यावे. शिवाय रसायनशास्त्र विषयाबाबत माहिती दिली. प्राचार्य डॉ.एस.एन. पाटील यांनी पदवी अभ्यासक्रमात आपले ज्ञान व कौशल्य याचा वापर कसा करावा व विद्यापीठ अनुदानबाबत माहिती दिली. प्रा.डॉ.अनिल बेलदार, प्रा.जयू चव्हाण, प्रा.मिलिंद पाटील यांनीही मार्गदर्शन केले. शहादा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमाबरोबर वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी, असे आवाहन केले . प्रास्ताविक प्रा.राजेंद्र पाटील यांनी केले.