तळोद्यात महिनाभरात 900 बैल विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:22 IST2018-10-08T11:22:40+5:302018-10-08T11:22:46+5:30

900 bulls sold in Pallod within a month | तळोद्यात महिनाभरात 900 बैल विक्री

तळोद्यात महिनाभरात 900 बैल विक्री

चिनोदा : तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भरवल्या जाणा:या बैलबाजारात सप्टेंबर महिन्यात 1 कोटी रूपयांच्या बैलांची विक्री केली असून येत्या दस:यासाठी बाजार सज्ज होतो आह़े सप्टेंबर महिन्यात चार शुक्रवारी झालेल्या बाजारात 900 बैलांची विक्री झाली़ यातून बाजार समितीला महसूल मिळाला असून  व्यापा:यांमध्ये उत्साह निर्माण झाला आह़े 
तळोदा बैलबाजारात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने बैलांच्या विक्रीत वाढ होत आह़े प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यातील व्यापा:यांसोबत जळगाव, धुळे, बुलढाणा, गुजरात राज्यातील सेलंबा, सागबारा, भरूच, लगतच्या कुकरमुंडा, निझर आणि उच्छल येथूनही व्यापारी आणि शेतकरी बैलखरेदीसाठी या बाजारात येतात़ सातपुडय़ाच्या दुर्गम भागात पशुपालकांनी संगोपन करून वाढवलेल्या गावठी बैलांची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी उत्तरोत्तर बैल खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना वेग आल्याची माहिती देण्यात आली आह़े प्रामुख्याने शेतकरी खरीप किंवा रब्बी हंगामाच्या सुरूवातील शेतीऔजारे, पशुधन किंवा श्ेाती यंत्रांची खरेदी करतात़ परंतू सप्टेंबर महिन्यात 1 हजार 600 बैलांची बाजारात आवक होऊन त्यातील 900 बैलांची विक्री झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े प्रामुख्याने येथे बैल खरेदीसाठी येणारे व्यापारी आणि शेतकरी हे शेती ह्या एकमेव उद्देशासाठी बैलांची खरेदी विक्री करत असल्याने प्रतिसाद वाढत असल्याचे सांगण्यात येत आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात संगोपन करण्यात आलेल्या गावठी बैलांची प्रत्येक शुक्रवारी आवक वाढत असल्याची माहिती देण्यात आली आह़े दस:याला या बैलबाजारात एकाच दिवसात किमान 40 ते 50 लाख रूपयांची उलाढाल होत़े 90 हजार रुपयांर्पयत शेतकरी बैलजोडी खरेदी करून घेऊन जातात़ यंदाही दस:याची तयारी सुरू असून यावेळी किमान 1 हजार बैलांची आवक होण्याची शक्यता आह़े यासाठी तळोदा बाजार समितीत तयारी सुरु आह़े यात दुर्गम भागातील आदिवासी पशुपालकांकडून याठिकाणी एकापेक्षा अधिक बैल जोडय़ा विक्रीसाठी आणल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यादृष्टीने तयार करण्यात येणार आह़े 
 

Web Title: 900 bulls sold in Pallod within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.