आनलाईन वाहन विक्रीतून एकाला ९५ हजारात चूना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:44 AM2019-12-17T11:44:37+5:302019-12-17T11:44:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ओएलएक्सवर चारचाकी वाहन विक्री करायचे सांगून दोघांनी ढंढाणे येथील एकाला ९५ हजार रुपयांमध्ये चूना ...

90 thousand lime from one of the online vehicle sales | आनलाईन वाहन विक्रीतून एकाला ९५ हजारात चूना

आनलाईन वाहन विक्रीतून एकाला ९५ हजारात चूना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ओएलएक्सवर चारचाकी वाहन विक्री करायचे सांगून दोघांनी ढंढाणे येथील एकाला ९५ हजार रुपयांमध्ये चूना लावल्याची घटना घडली. तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात अशा प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे.
इंटरनेटच्या ओएलएक्स या साईटवर चार चाकी वाहन विक्रीची जाहीरात पाहून ढंढाणे येथील जयेश राकेश नागरे या तरुणाने संबधीत विक्रेत्याशी संपर्क साधला. त्यानुसार ९५ हजार १०० रुपयात वाहन विक्रीचा सौदा ठरला. सौद्यानंतर फोन पे द्वारे पैसे भरण्यास सांगितले.
वेळोवेळी एकुण ९५ हजार ५०० रुपये नागरे यांनी परिमलकुमार व रवीकुमार यांच्या फोन पे अकाऊंटवर भरले. परंतु वाहन मिळत नसल्याचे पाहून आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर जयेश नागरे यांनी संबधीत दोघांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नागरे यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून परिम
लकुमार व रवीकुमार या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक पवार करीत आहे.

Web Title: 90 thousand lime from one of the online vehicle sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.